STORYMIRROR

Rohit Khamkar

Abstract Others

3  

Rohit Khamkar

Abstract Others

स्वप्नजोड

स्वप्नजोड

1 min
190

मोडलं माझ सपान जसं, इचार केला न्हाई.

संपल्याच समाधान सारं, शांतता ही अशी येई.


मन लागना कश्यात, होणारं होतो असा निवांत.

भोगीयासी आला, असा स्मशान एकांत.


फक्त उरल्या त्या आशा, आणी आस चमत्काराची.

लढा आहे संकटाशी, ही जागा ना मरणाची.


कदाचित न्हाई मिळालं, ते यश मरेपर्यंत.

पण प्रयत्नानचा आनंद असेल, कायम शेवटपर्यंत.


काहीही असो, आता लढायचं जिंकण्यासाठी.

थांबलोय थोडा, ताकत हवी एकदा उठण्यासाठी.


प्रत्येक त्या परिस्थितीला, आता असं बिनधास्त नडायचय.

मोडलेलं ते माझच स्वप्न, पुन्हा मलाच जोडायचय.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract