मानवता धर्म
मानवता धर्म
जगणे मरणे ठरलेले
कशास हवा मग बोभाटा
हवे काय या इवल्या देहा
कशास शोधसी बिकट वाटा ॥१॥
नको मनात भलत्या आशा
व्हावी ज्यात घोर निराशा
सरळ मार्गाचा धरून आग्रह
मार्गक्रमणा दाही दिशा ॥२॥
अन्न वस्त्र निवारा सोडून
हवे तुजला काय वेगळे
मनुष्य जन्म मिळे एकदा
आनंदाने जगुया सगळे ॥३॥
संकुचित भावनांना नको थारा
उदार विचारांचे करा स्वागत
विशाल मनाने करू जनसेवा
मानुसकीच्या मुल्यांना जागत ॥४॥
मानवता धर्म हा सर्वश्रेष्ठ
नका करु कधी भेदभाव
श्रद्धा ठेवा आपल्या वचनांवर
स्वागतास उभा प्रेमळ गाव ॥५॥
