STORYMIRROR

Manisha Awekar

Abstract

3  

Manisha Awekar

Abstract

आरोग्य हीच संपत्ती

आरोग्य हीच संपत्ती

1 min
448

आरोग्याचे दान लाभे

वंशपरंपरा रिती

वारसाहक्काने येती

गुण चांगले मिळती    (१)


कला सौंदर्य गुण

शारिरीक ठेवणीही

रंग उंची लकबीही

माता पित्याकडूनही   (२)


जपा नित्य आरोग्याला

करा व्यायाम रोजचा

ताजे स्वच्छ अन्न खावे

नको मेवा बाहेरचा     (३)


राखा स्वच्छता नित्य 

तन अन् मनाचीही

स्वच्छ तनमनामधे

किल्ली आयुःआरोग्याची (४)


गप्पा चेष्टा विनोदाने

मन शांत स्वस्थ ठेवा

देवा दे अक्षयदान

आरोग्याचे ह्या मानवा   (५)


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

Similar marathi poem from Abstract