डाँक्टर व परिचारिकांचे योगदान
डाँक्टर व परिचारिकांचे योगदान
कोरोनाची महामारी
वादळ संकटाचे
मानवजात संहार
हे चक्र निसर्गाचे (१)
सिद्ध डॉक्टर परिचारीका
लढण्यास कोरोनाशी
सेवा ऋग्णांची अखंड
सेवाधर्म हो मनाशी (२)
लढा देणे कोरोनाशी
असे महाकर्मकठीण
किट संरक्षक घालूनी
कर्तव्यधर्म श्रेष्ठ जाण (३)
कधी केली नाही पर्वा
जीव धोक्यात घालता
पर्वा नाही घड्याळाची
सेवा रुग्णांची करता (४)
मानवाने मानवाला
वाचविणे हाच धर्म
अहोरात्र अखंडित
रुग्णसेवा हेच कर्म (५)
धीर देती सदैवचि
कोरोना बाधितांना
आत्मविश्वास वाढवूनी
जागवती अंर्तशक्तींना (६)
सलाम आमुचे तुम्हांस
कोटी कोटी मनातूनी
झटलात मनापासूनी
मानवता धर्म स्मरुनी (७)
