STORYMIRROR

BABAJI HULE

Abstract

3  

BABAJI HULE

Abstract

कुटुंब माझे

कुटुंब माझे

1 min
258

चार बिदूंच्या चौकटीला एकमेकांशी रेषेने जोडावे 

असंख्य बिदूंच्या परिघाने वर्तुळ पूर्ण करावे

वीट, माती आणि सिमेंटला पाण्यानं जसं घट्ट पकडावे 

कुटूंब माझे एकत्रित नांदे, घर मजला ऐसे हवे

स्वप्नातील बंगला बांधला आम्ही आपल्यातल्या एकीने 

अविस्मरणीय क्षणाने उभारिले या वास्तूला फार मोठ्या प्रेरणेने 

विश्वास आहे आमचा सर्वांचा एकमेकांवर आपुलकीने 

एकत्र विणलय आम्हांला मायेच्या जाळ्यांनी आणि स्वाभिमानाने

आधार आहे तो ज्यांनी स्वतःला जगताना नाही पाहिले 

प्रामाणिकपणाची भिंत रोवूनी त्यांनी आमचे मार्गदर्शन केले 

भावनेच्या किंमतीत एकोप्याचा मंत्रानी आयुष्य आमचे सजविले 

दुखावलेल्या मनातील अंतर नात्यांच्या स्थिरतेने कमी केले

अंगणात फुललंय माझ्या पारिजातकाचं रोपटं 

छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत झारीने पाणी घालून केलंय त्याला मोठं 

वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने अनुभवतोय एकीचा परिपाठ 

गरजेपोटी हाथ मदतीचा सर्वांना, सणावारात असतो मात्र थाट

वारसा जपुनी संस्कारांचे दाखवू अस्तित्व एकीचे 

शेवटच्या श्वासापर्यंत कौतुकाने जपू ममत्व मातीचे 

एकत्रित कष्टाने प्रतिनिधित्व करू आनंदाने समृद्धीचे 

नाही होणार कौटुंबिक अस्थिरता हे स्वप्नं सर्वांच्या मनीचे

लावू लळा एकमेकांना, वाढवू जिव्हाळा आपलेसे व्हावे 

एकमेकांच्या तालात ताल मिसळुनी शत्रूलाही आपले करावे 

एकच विनंती देवाला शांत झोपेचे मनोधैर्य रात्रीस आम्हा द्यावे 

निरभ्र आकाशाचे एकच पांघरूण तू आम्हास घालावे 

नकारात्मक विचारांच्या कवाडी भिंतींना बाजूला करावे

कुटुंब माझे एकत्रित नांदे, घर मजला ऐसे हवे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract