STORYMIRROR

sudhakar wankhade

Abstract Inspirational

3  

sudhakar wankhade

Abstract Inspirational

तुकडे दिलाचे..

तुकडे दिलाचे..

1 min
216

बोलू नको कुणा तू बोल हे अंतरीचे...

तुकडे तुझे ते करतील कमजोर या दीलाचे..!!ध्रु!!


ऐकून घेती दुःख पण टिंगल तुझी ते करतील...

हळव्या मनाचा म्हणून शिक्का तुला ते मारतील.

मनाचे भाव होईल आपले तुझा डोळ्याचे...!!१!! तुकडे तुझे ते..


छळतील तुला ते सारे देऊन मनास चटके...

वागून तुझ संगे त्यांच्या परीने हटके...

मनास मन सांगे समजाऊनी स्वतःचे...!!२!!तुकडे तुझे ते..


आरसा बनून तू स्वतःस त्यात झाकून पहावे..

उथळ तिथळ पाण्याल विचार कंग्व्याने सारावे..

डाग असे पुसावे रडून पसरणाऱ्या काजलाचे !!३!!तुकडे तुझे ते..


चिंता त्याची तू करुनी जाळे स्वतःच्या जीवास...

तो मजेत जगतो आहे ना तीळमात्र दुःख त्यास... 

येईल तुझी आठवण कोणी घालेल घाव त्याच्या काळजास.!!४!! तुकडे तुझे ते..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract