STORYMIRROR

sudhakar wankhade

Inspirational

4  

sudhakar wankhade

Inspirational

पीठ..

पीठ..

1 min
425

किती लिहू गुण तुझे माय माझा लेखणी...,

आठवता काळ जुना डोळ्या येई पाणी...!! ध्रु!!

उचल तो घेई बाप,दारू , मटक्यात जाई,..

तरी बापा पाठी तू ग उस्तोडी जाई...

वाचलेले लावी तू लेकरांच् शिक्षणी...!!१!!

आठवता जुना काळ डोळ्या येई पाणी

भरतीची मी ग जवा धरली वाट, ...

संगतील द्याया भाकर घरी नवत पीठ...

उसन्या पिठाची कशी विसरू कहाणी..!!२!!

आठवत काळ जुना डोळ्या येई पाणी

खटल्याच रांधलल ग तरी दुर्डित नाही उरलं...

लेकराला पाहुनी ग तुझ पोट भरलं...

पोटाल पडल्या आढया झाकल्या तू ग पदरानी..!!३!!

आठवत काळ जुना..

सीमेवरती आहे उभा आई तुझा तान्हा..

विसरू कसा मी तुझा पाच्टातील पान्हा..

माय अन् भूमी सेवा सुधाकर तुझा द्यानी..!!४!!

आठवतं काळ जुना डोळ्या येई पाणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational