लग्न
लग्न
लग्न म्हणजे
जबाबदारी नैतिक
दोन कुटुंबाची
साधलेली जवळीक
लग्नाला बेडी
असेही म्हणतात
दोन जीव
एकमेकांत गुरफटतात
लग्न एक
सुंदर प्रवास
स्वप्नांचा एक
नवा ध्यास
लग्न जाणीव
प्रेमळ मातृत्वाची
चाहूल पुरुषातील
पित्याच्या कर्तृत्वाची
लग्न एक
निरपेक्ष नातं
लोणच्यासारखं कसं
मुरत जातं
संसारात एकमेकांना
समजून घेणं
विचार जुळवत
पुढे जाणं
