STORYMIRROR

Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

कोरोना लस

कोरोना लस

1 min
266

 कोरोनाच्या लसीकरणाचे

आहेत दोन डोस

घेता डोस कोरोनाला

ठेवी चार कोस


पहिल्यासारखं खेळतं

हवं असेल आयुष्य

तर लस घेऊन करा

सुरक्षित आपले भविष्य


कोरोनाचा फैलाव

रोखण्यासाठी हा उपाय

उगीचच नको ते भाष्य

करून फायदा काय?


ह्या आधी पण घेतल्या

ना आपण कितीतरी लशी

मग ह्या कोरोनाच्या

लशीचीच भीती कशी?


लस घेता नको चढायला

दवाखान्याच्या पायऱ्या

हसतखेळत पार पाडता

येतील जबाबदाऱ्या साऱ्या


वाट कसली बघता

करा आजच लसीकरण

आनंदाने भरा जीवनातील

प्रत्येक क्षणनक्षण


Rate this content
Log in