STORYMIRROR

Priti Dabade

Others

3  

Priti Dabade

Others

निसर्ग-एक अनमोल दागिना

निसर्ग-एक अनमोल दागिना

1 min
224

निसर्ग आहे आपणांस

मिळालेले वरदान

जणू हिरवळीची 

सभोवार पसरलेली खाण


हिरवीगार उंचउंच झाडे 

अन् रंगबिरंगी फुले

पाऊस पडता हा मोर

का थुईथुई डुले?


पानांवर दवबिंदूंची

तयार होते मोहक नक्षी

त्यावर बसुनि साद

घालती निरनिराळे पक्षी


पावसात होई धरती अन्

नभाचे लोभसवाणे मिलन

गारांचा वर्षाव होता वाटे

जणू रांगोळी सजली छान


गारगार वारा करी

तनामनास बेधुंद

श्वासात साठवून घ्यावा

त्याचा आगळा गंध


निसर्ग करी तीन

ऋतूंचा सुंदर प्रवास

मंत्रमुग्ध करत सारा

आसमंत पसरवी सुवास


कड्याकपाऱ्यातूनी वाहणारे

निर्मळ पाण्याचे झरे

दाखवी निसर्गाचे नटलेले

रूप ते गोजिरवाणे खरे


दिवसा दिनकर देई

स्वच्छ सूर्यप्रकाश

रात्री भरून जाई

चांदण्यांनी सारे आकाश


करू नकोस मानवा

तू निसर्गाचा ऱ्हास

तुलाच सोसावा लागेल

त्याच्या प्रकोपाचा त्रास


येऊ नये तुझ्यावर 

पश्चातापाची वेळ

थांबव तुझा हा सिमेंटच्या

जंगलाचा अघोरी खेळ


झाडे लावूनी कर

निसर्गाचे रक्षण

होऊ देऊ नकोस

त्याचे असे भक्षण


Rate this content
Log in