STORYMIRROR

Priti Dabade

Action Inspirational Others

2  

Priti Dabade

Action Inspirational Others

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

धर्मवीर छत्रपती संभाजीराजे

1 min
46

संभाजीराजे होते देखणे

शूरहोते एक आदर्श धर्मवीर

सईबाईंचा बाळ,शिवबांचा छावा

तरबेज होते करण्यात गनिमीकावा


लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकले

जिजाऊंनी आपल्या मायेने वाढवले

अनेक भाषांवर होते प्रभुत्व

यशस्वी मोहिमा करणारे व्यक्तिमत्त्व


चौदाव्या वर्षी लिहिला बुधभूषण

अफाट बुद्धी एक आभूषण

संकटावर समर्थपणे मात केली

तेजोमय कारकीर्द सर्वत्र गाजली


मराठी साम्राज्याचा केला विस्तार

ठेवुनी शत्रूवर नजर धारदार

सांभाळली हिंमतीने स्वराज्याची धुरा

पराक्रमाने गाजलेला खाणीतील हीरा

प्रजेकडे जातीने लक्ष दिले

कर्तव्यदक्ष म्हणून नावारूपास आले

मरण यातना केल्या सहन

शत्रूस नाही गेले शरण


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action