अंकगीत
अंकगीत


एक दोन तीन
एक दोन तीन
कामाचा आला
नुसता शीण
चार पाच सहा
चार पाच सहा
समोर आला
वाफाळलेला चहा
सात आठ नऊ
सात आठ नऊ
फस्त केला
वरणभात मऊ
दहा अकरा बारा
दहा अकरा बारा
ताणून दिली
मग जरा
तेरा चौदा पंधरा
तेरा चौदा पंधरा
सोनकिरणांनी
भरली धरा
सोळा सतरा अठरा
सोळा सतरा अठरा
ताजेतवाने वाटून
चेहरा झाला हसरा
एकोणीस वीस एकवीस
एकोणीस वीस एकवीस
शुद्धलेखन लिहून
गणितं सोडवली तीस
बावीस तेवीस चोवीस
बावीस तेवीस चोवीस
घरकामात ठेवली नाही
कोणती गुंजावीस
पंचवीस सव्वीस सत्तावीस
पंचवीस सव्वीस सत्तावीस
हलव्यासाठी केला मग
दुधी भोपळ्याचा कीस
अठ्ठावीस एकोणतीस तीस
अठ्ठावीस एकोणतीस तीस
उकाड्याने नुसता
जीव झाला कासावीस