STORYMIRROR

Jyoti gosavi

Comedy

4  

Jyoti gosavi

Comedy

मोबाईल ला बाय-बाय

मोबाईल ला बाय-बाय

1 min
245

आज ग्रुप वरती यायला

 जराही वेळ नाही

 घरामध्ये झाले आहे

 मी स्वयंपाकीण बाई

 या करोना च्या पायी

 आमची कामवाली बाई

 मुळीसुद्धा येत नाही

  सांगा आता मला 

 काय करू मी बाई

सकाळी उठले 

बनवला नाश्ता 

थोडीशी इडली,

 थोडासा पास्ता

त्याच्यासाठी मला

 किती खाव्या 

लागल्यात खस्ता

 दुपारी केली पोळी

 भाजी वरण भात

 स्वयंपाकात दिली

 घरच्यांनी थोडी साथ

 पण त्यामुळे मोबाईलच्या

 बटनावर पडलाच

 नाही हात 

संध्याकाळी केली

 गरमागरम खिचडी

 सोबतीला होती 

काकडीची पचडी 

वरती गरमागरम 

तुपाची धार 

सोबतीला लोणचे 

आणि पापड यार

 जेवून मग बिछान्यात

 गुडूप झाले

 डोळ्यावर एवढी पेंग

 मोबाईलला नाही पाहिले

 असाच माझा

 आजचा दिवस गेला

 हाय रे हाय 

मग मोबाईल ला म्हटले

 आजच्या दिवस बाय-बाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy