STORYMIRROR

Sanjay Pande

Comedy Others

4  

Sanjay Pande

Comedy Others

ड्राय डे

ड्राय डे

1 min
1.5K

ड्राय डे च्या दिवशी ही

काय राव दारू ढोसता

वर सरकार लाच तुम्ही

बम दारू पिऊन कोसता।।


इतर सारे दिवस तर

आहेतच ना ढोसायला

एक दिवस नाही होत

का थोड़ी कळ सोसायला।।


ड्राय डे लाच का भाऊ

मुद्दाम प्यायला बसतात

सारे जण आपल्याकडे

बोट करून हसतात।।


सरकार पण विचारानेच

काढते ना ड्राय डे चा आदेश

काही होत नाही पिले तर

असा वर देता राजेहो उपदेश।।


एक दिवस नाही पिले तर

आभाळ आहे का कोसळणार

काही कमीजास्त झाले तर

तुमच्या मुलांना कोण सांभाळणार।।



ड्राय डे चा आपण आदर

आता तरी करणार का?

ड्राय डे च्या दिवशी तरी

ढोसण्याचे टाळणार का?।।














Rate this content
Log in

Similar marathi poem from Comedy