बाहेर फिरायला....!
बाहेर फिरायला....!
बाहेर फिरायला बघतोयां
मनांत सगळ्यांच्या धास्ती भरतीयां
रूग्ण वाहिनी मोठा आवाज करतीया
काळजाच पाणी होत् या रूग्ण सापडला
असं वाटत या.आजुबाजुला कुजबुज ऐकू येती या....!
गप्पां मारता ना कुणी कंस येतया
कुणाला कूठं कळतया
झालं तरी कुणी सांगतया
दुसरया दिवशी
पोझिटिवह झालया
काल ह्याच्या
संग फिरलोया हे बेन कुठ बोललंया
मला होईल का रातं जागून काढलीया
मनांत भिती भरली या...
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया…!
सकाळी कामानिमित निघाल की
हाताला सेनिटाईजर मास्क लावून
जातो या कुणी खोकलं शिकलं की
असं वाटत या बाजूच्याला कोरोना
झालया.....!
अणु एवढ्या विषाणूने हाहाःकार
माजवलाया संगळया देशाला
वेड लावल
या आर्थिक व्यवस्थेला भिकेच
ढवाळं लागलया गं बया
कोरोनानं वाटोळं गं बया
आता गं बया आख्यी पब्लिक
घाबरली गं बया
केलं कोरोनानं पब्लिकचं गं वाटुळं बया…..!
शेवटच्या वर्षीच्या परिक्षेचा पेपर
आॅनलाईन केला गं बया
कशी पोरंपोरी पास होणारं बया
शिक्षणाचं वाटोळं झालं गं बया
बातम्या वाली सुशांत रिया
आत्महत्या प्रकरण त्यात कंगना आगीतून
फुफाटयात उतरलिया शेतकरयाची
कुठं किंव येतीया गोरगरीब राजकीय
आगीत पोळतीया केलं राजकारनाणं
पब्लिकचं गं वाटुळं बया…
कोरोनानं वाटोळं केलं गं बया
जनतेचं लाॅकडाॅऊननं कबंर कसलिया गं बया....!
केलं पब्लिकचं गं वाटुळं बया