पाय जमिनीवर राहिना
पाय जमिनीवर राहिना
पाय जमिनीवर राहिना
आभाळाला हात जाईना
तूझ्यावरच प्रेम कमी होईना.....
माझं मन घरी लागेना
तूझ्या सोबत राहू वाटते ना
मला तू हवी हवीशी ना......
तुझी माझी प्रीत कळेना
डोळ्यातल्या आसवांना
तुझे शब्द बोलके करतेना....
तुझ्या खऱ्या प्रेमाची परीक्षा
माझी तू सारखी घेतेना
मला तुझ्याशिवाय जगने
अशक्य आहे ना.....
तुझे हसरे रूप गोड खुलते ना
गालावरची खळी डोळ्यात मावेना
तुझ एक दिवस न दिसने माझ्या
मनाला लागलं ना.....!
तूझ्या माझ्या आयुष्यात
स्वप्नांची नवी दुनिया बनवु ना
माझ्या इश्काची मेंदी रंगू देना.....
पाय जमिनीवर राहिना
आभाळाला हात जाईना
तूझ्यावरच प्रेम कमी होईना.....!

