जगण्याची उमेद..!
जगण्याची उमेद..!


जगण्याची उमेद प्रत्येकाला वाटते
परिस्थिती पुढे काहीचं उमगत नसते...
स्वतःच्या जीवाला जपण्यासाठी
खूप काही करण्याची संधी मिळते....
आपल्या नाकर्ते पणाची सवय अडते
आपल्या जीवनाची दिशा पुसट होते
शेवटच्या श्वासापर्यंत लढाई असते
अथक परिश्रम घेऊन जीत होईल असे वाटते...!
पुन्हा नवीन संजीवनी मिळेल असे
मनाला एक वेडी आशा लावते.....!
आपल्या शरीराची किंमत कुठे कळते
शेवटी तीच उमेद देवालाच मान्य कळते....!