STORYMIRROR

Umesh Salunke

Others

3  

Umesh Salunke

Others

जिद्द सोडायची नाय रे गड्या

जिद्द सोडायची नाय रे गड्या

1 min
350

जिद्द सोडायची नाय रे गड्या

शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं रे गड्या

कोणी काय बोलले तर वाईट मानू नको रे गड्या....i


तू तुझ्या कर्मावर 

तू तुझ्या प्रामाणिक कष्टावर

तू तुझ्या विश्वासावर

तू हे जग जिकणार आहे रे गड्या.....i


काही ना काही करत रहा रे गड्या

जो पर्यंत तुझ ध्येय पूर्ण होत नाही

तो पर्यंत हार मानू नकोस रे गड्या


दुनिया पोसत नाही रे गड्या

तुझ विश्व तुलाच निर्माण करायचं रे गड्या

मनातली मळभ झटक रे गड्या....i


अपयश आल म्हणून व्यसनाधीन होउ नको रे गड्या

आयुष्यात आला तर चागल करून जा रे गड्या.   

नावं काढताच डोळ्यातून अश्रु आले पाहिजे रे गड्या....i

   

नैराश्य आल् म्हणून स्वतः च जीवन संपवू

नकोस रे गड्या तुझ्या वर अवलबून असणारी

सारे माग रडतील रे गड्या....i


Rate this content
Log in