क्रांतीची मशाल होऊन
क्रांतीची मशाल होऊन
करू कशावर कविता...
आया-बहीणीवर होणाऱ्या
बलत्कारावर..?
आत्महत्या करणाऱ्या
शेतकरी बापावर..?
की, सीमेवर शहीद होऊन
तिरंग्यात गुंडाळून येणाऱ्या
माझ्या शूर भावावर..
निष्पापांचा बळी घेणाऱ्या
घडवून आणलेल्या
हिंसक दंगलीवर..
की, नामर्द, षंढ, निती भ्रष्ट
व्यवस्थेवर...?
यथा राजा तथा प्रजा...
राजकारणी करु शकतात
संपूर्ण कायापालट,
करु शकतात स्वर्ग निर्माण...
इथं मात्र होतंय
फक्त देश बरबादीचं राजकारण
नी आपलंच पोट भरणं..
लुटल्या जातोय देश
नी झालाय सारा अंध:कार...!
म्हणून म्हणतोय
एकदा घडवावा इतिहास...
हाती सुदर्शन चक्र घेऊन
उठावे पेटून..
स्वतःच स्वतःचे मरण लिहून.
क्रांतीची मशाल होऊन...
