Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sanjay Pande

Others

3  

Sanjay Pande

Others

आई

आई

1 min
11.5K


आईच्या रागावण्यात ही

प्रेमाचाच असतो पाझर

आपल्या बाळाचे भले व्हावे

हाच सतत असतो जागर।।


पाठीत रट्टा मारतांना पण

आईच्या डोळ्यात असते पाणी

लगेच लागले तर नाहीना बाळा

अशी मुख़ातून निघते वाणी।।


आपण उपाशी राहून बाळाला

आनंदाने भरवत असते आई

आपले दुःख पदरात लपवून

सदा हसत असते ही आई।।


ठेच लागता आपल्या पोराला

आईचे डोळे लगेच पाणावतात

सांगा अश्या संवेदना इतर

कोणत्या नात्यात जाणवतात।।


आईच्या काळजाचा अजुन

थांगपत्ता नाहीच कोणाला

आपल्या मुलाच्या काळजीत

जीव लावते आई पणाला।।


आईसारखे निरपेक्ष प्रेम

सांगा बरे कुठे मिळते 

आईच्या प्रेमाची किंमत

आई गेलेल्यालाच कळते ।।


Rate this content
Log in