होळी
होळी
आजकाल सण उत्सव म्हटले की
अंगावर काटा का बरे येतो
या सण, उत्सवाचा आजकाल
आपण आनंद खरेच का घेतो!
किती आनंद होता सांगाना
होळी या पवित्र अश्या सणाचा
आठ दिवस आधीपासुनच
साठा करत असत सर्व शेणाचा!
सर्व लहान मोठे मिळून असत
शेणाच्या गोल चाकोल्या बनवत
इकडून तिकडून फिरून फिरून
होळीला असत लाकडे जमवत!
पुरणाची पोळी यथेच्छ खाऊन
देत असोत दुपारी मस्त ताणुन
आता अभ्यासाच्या ओझ्यातच
सारी मुले जाताहेत पूरे दबु
न!
मोठमोठ्ठी गाठी घेण्यासाठी
सारी मुले करत असत हट्ट
दोऱ्यात ओवलेली गोड गाठी
खात असोत पकडून घट्ट!
एकमेकांच्या जाऊन घरी
घातली जाई गळ्यात गाठी
प्रेम ,आपूलकी आणि आनंद
दिसे प्रत्येकाच्याच पाठी!
होळी पेटताच वाहीली जाई
एकमेकांना शिव्याची लाखोळी
पण त्यात कुठेच दिसत नव्हती
वैयक्तिक क्लेषाची साखळी!
अशी होळी परत आपण सांगा
खरोखर आहोत का पेटवणार
एकमेकांचे दुःख हलके करत
सांगाना आपण होळी मनवणार?