STORYMIRROR

Sanjay Pande

Inspirational

4  

Sanjay Pande

Inspirational

अंगत पंगत

अंगत पंगत

1 min
545


अंगत पंगत तर आता

आपण सारे विसरतो

प्रेमाने बोलायचे सोडून

एकमेकावर बिथरतो।।


किती होती सांगा मजा

अंगत पंगत करण्यात

वेगळाच आनंद होता

स्वादिष्ट पदार्थ चरण्यात।।


कोणी पोळी आणे तर 

कोणी आणे मसाले भात

एकमेकांचे पदार्थ सारे

कसे चाटून पुसून खात।।


भाज्यांचेच पाँच सहा

असत चमचमीत प्रकार

प्रत्येकाच्या पोळीचा

असे वेगवेगळा आकार।।


गप्पा करत खाण्यात 

किती होते आठवा सुख

चारचौघात खात खात

विसरत होतो आपण दुःख।।


एका ताटात जेवतांना

प्रेमाची फूटे नव पालवी

आता आरोग्याच्या भितीने

जो तो वेगवेगळे कालवी।।


आठ दहा जणांचा तेव्हा

घोळका असे जमलेला

काम विभागून असल्याने

कोणी नसे तेव्हा दमलेला।।


आता अंगत पंगत करण्या

वाटते आपल्याला लाज

हॉटेलात बर्थ डे करण्यात

वाटते आपल्याला नाज।।


पंचताराकिंत हॉटेल लाही

अंगत पंगत ची चव नाही

किती ही असो चमचमीत

हॉटेलात प्रेमाचा ओलावा नाही।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational