STORYMIRROR

Sanjay Pande

Romance Fantasy

3  

Sanjay Pande

Romance Fantasy

आँधळे प्रेम

आँधळे प्रेम

1 min
638

माझ्याकडे पाहून ती

खुदकन हसली

मला वाटले राजेहो

पोरगी फसली।।


नट्टापट्टा करून गेलो

ती परत हसली

मला वाटले राजेही

नक्कीच पटली।।


तिच्या डोळ्यात डोळे

घालून मी बसलो

बोलक्या डोळ्यात

जास्तच मी रमलो।।


तिची नजर माझ्यावर

होती एकटक

माझ्या छातीत मात्र

होत होते धकधक।।


तिच्या सौदर्याची

काय सांगू कहानी

खतरा होती ती

जणू सौंदर्याची राणी।।


तिचे हसने मात्र

तसेच होते चालू

मनात म्हटले आता

बस कर ना मालू।।


तिचा हात मी

अलगद क़ुरवाळला

धन्यवाद शब्द तिने

हळूच पुटपुटला।।


मग माझी थोड़ी

हिमंत पण वाढली

तिला लव्ह यू म्हणणार

इतक्यात ती उभी ठाकली।।


मला थोडा रस्ता क्रॉस

करून देता का वदली

हातात स्टिक घेऊन

चालायला लागली।।


माझ्या आले लक्ष्यात

रहस्य हसण्याचे

डोळ्यात डोळे घालून

हसत बसण्याचे।।


इतके बोलके डोळे

निर्जीव कसे

जो पाहील तो

चटकन फसे।।


प्रेमाची भावना

करुणेने घेतली

त्या बिचारीची

कीव करावी वाटली।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance