STORYMIRROR

Sanjay Pande

Others

3  

Sanjay Pande

Others

पाणी

पाणी

1 min
431


झाडे तोडून केले

सारे जंगल खलास

साऱ्या विहिरीचे गेले

पाणी खोल तळास।।


काव काव करत

उडतो मी आकाशात

पाणी कुठे बरे मिळेल

शोधतो मी नकाशात।।


नदी,तलाव सारेच

कसे काय आटले

पाण्यावाचून पहा

माझे प्राण हे दाटले।।


आता माठ ही पहा

झाले सगळे कमी

माठात मिळेल पाणी

याची नाहीच हमी।।


पाऊस ही आता

कमीच तर पडतो

पाण्यासाठी जो तो

आज येथे रडतो।।


पाण्यावाचुन कित्येक

कावळे बिचारे मेले

भाताला शिवणारे

कावळे कुठे हो गेले।।


Rate this content
Log in