STORYMIRROR

Suvarna Patukale

Inspirational

3  

Suvarna Patukale

Inspirational

काजवा

काजवा

1 min
281

 मी भयभीत झाले होते

एकदा खूप काळोख झाला

अचानक एक काजवा

चमकत माझ्या समोर आला

निराशेने तेव्हा मला

केलं होतं हताश

छोट्याशा काजव्याकडून

मी घेतला, इवलासा प्रकाश

आता कधी अंधारल की

काजवा फक्त आठवते

तो प्रकाश पुन्हा नजरेत

आठवणीतून साठवते

असंच प्रकाशाचं दान

मी देखील कोणाला द्यावं

खरंच आता मन म्हणतंय

काजवाच बनून यावं

पण आता या काजव्यानं

डोळ्यात माझ्या रहावं

परत कधी काळोख झाला,

की नजरेने तिथे पहावं

त्यासाठी प्रकाशात नाही,

वाटतं अंधारात जावं

तो काजवा कुठं दिसतोय का?

पहायला पुन्हा अंधारून यावं. 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational