Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".
Win cash rewards worth Rs.45,000. Participate in "A Writing Contest with a TWIST".

Suvarna Patukale

Inspirational

4.0  

Suvarna Patukale

Inspirational

विसरुनिया आज निघाले

विसरुनिया आज निघाले

1 min 186 1 min 186

विसरूनिया आज निघाले, आघात तुझे जीवना

जे फुलवित होते निखारे, अन् जाळीत संवेदना llधृll

व्रण ओसरती जखमांचे

क्षण पाझरतील सुखाचे 

दिसतील निरागस चेहरे 

निष्पाप ख-या भावना

विसरूनिया आज निघाले, आघात तुझे जीवना  

जे फुलवित होते निखारे, अन् जाळीत संवेदना llधृll

आता ना मनावर घाला 

चाले ना कुणाचा भाला 

ना बोल ना उपहासाची

करतील कुणी कामना

विसरूनिया आज निघाले, आघात तुझे जीवना 

जे फुलवित होते निखारे, अन् जाळीत संवेदना llधृll

उरतो अभिशाप कशाचा 

सरतो परिणाम विषाचा

कमजोर ना करतील कधीही 

कसल्याही अवहेलना 

विसरूनिया आज निघाले, आघात तुझे जीवना 

जे फुलवित होते निखारे, अन् जाळीत संवेदना llधृll

हसतील उदासीन चेहरे 

इतिहास पुसनिया जुना

नवनिर्मितीच आकारा ये

रुसतील जुन्या कल्पना 

विसरूनिया आज निघाले, आघात तुझे जीवना

जे फुलवित होते निखारे, अन् जाळीत संवेदनl lधृll

रुजवीन पुन्हा जन्माला 

सजवीन पुन्हा कर्माला 

हा जीवच जगण्यासाठी 

भूमी अंकुरलेला पुन्हा 

विसरूनिया आज निघाले, आघात तुझे जीवना  

जे फुलवित होते निखारे, अन् जाळीत संवेदनl lधृll

हा विचारध्वज या नभी 

फडकतो राहूनी उभा

वाऱ्यासह जनीवनी घुमे

चिरकाल अशी गर्जना 

विसरूनिया आज निघाले, आघात तुझे जीवना  

जे फुलवित होते निखारे, अन् जाळीत संवेदनl lधृll

Rate this content
Log in

More marathi poem from Suvarna Patukale

Similar marathi poem from Inspirational