STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

4  

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

सूर्याची पहिली किरणे...

सूर्याची पहिली किरणे...

1 min
381

सूर्याची पहिली किरणे

मी ओंजळीत माझ्या घेतली

ओसरली रात्र जुनी ती कालची 

पहाट नव्याने आज पुन्हा भेटली...


गर्द हिरव्या रानी दाटले

गवतावर दवबिंदू होऊन मोती

कोवळी किरणे झेलली मनी

घेऊन कोमल या हातावरती...


पांगले मळभ निराशेचे

आगमनाने गर्द पिवळ्या किरणांच्या

जागल्या सावल्या दाट झाडीत

बाभळी आंबा पिंपळ वड पारंब्याच्या...


घेतला रविने काळोख कवेत 

भेदून अंधार जगी या पसरलेला 

दिला उजेड दिसण्या मार्ग नवा 

काळोखात जो होता गुरफटलेला... 


आज पुन्हा झालो मार्गस्थ 

वळणावर नव्या आयुष्याच्या वाटेवर 

होऊन स्वार स्वीकारले जगणे 

उसळणाऱ्या त्या सागराच्या लाटेवर...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational