STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational

3  

Dhananjay Deshmukh

Abstract Inspirational

एकांत शोधताना...!

एकांत शोधताना...!

1 min
183

अलगद दुरावतात यातना

किनारी सागराच्या मी असताना

असतात सोबती लाटाही

नीरव शांत तो एकांत शोधतांना


क्षणिक का असेना पण

लाभतो आनंद अलवार वार्‍याचा

अंधार्‍या वाटेवर काजवाही

भासतो जणू तो अवतार ताऱ्याचा


शांत असता तन हे माझे 

मनही वार्‍यावर हुंदडू लागते 

एकांतात या निसर्गाच्या 

झाड वेलींच्या ते प्रेमात पडते 


सुखद क्षणांना एकांताच्या 

जमवून काव्यात मांडावे वाटते 

सांगावे वाटते शब्दातून सारे 

इतके समाधान या मनात दाटते 


लाभते सुख अगणित तिथे 

एकांताच्या सहवासात जगताना 

भरभरून वाटते जगावे पुन्हा 

कितीही दुःखाच्या दरीत असताना 


आजही पावले नेतात तिकडे 

तोच नीरव शांत एकांत शोधतांना 

तोच किनारा वाटतो हवा 

अंतरातला तो एकांत दूर करताना 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract