STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract

3  

Dhananjay Deshmukh

Abstract

मीच त्याचा मारेकरी

मीच त्याचा मारेकरी

1 min
220

एकटाच हा सागर

दूर राहिला किनारा

नाही ओहोटी भरती

नाही उरला सहारा...


होता कधीतरी येथे

सहवास या लाटांना

गेला दूर तो किनारा

देण्या भेट त्या घाटांना...


शांत वाराही इथला

अचेतन तो वाटला

श्‍वास माझा हरवला

कंठ उरात दाटला...


निर्विकार हा सागर

आज खूपच रुसला

गेला दूर किनारा तो

डाव कोणी हा पुसला...


आजवर जेथे गेलो

मीच त्याचा मारेकरी

नाही कळले कोण मी 

कशी आली ही लाचारी... 


केला दूर किनारा मी

मनातल्या सागराचा

गेलो पोहत सागर

अनामिक यातनांचा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract