STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

3  

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा

गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा

1 min
177

संगतीत तुझ्या लाभला मला

गोडवा मनांचा, हळव्या भावनांचा

पडला कधीच विसर मला

नकळत मनी आलेल्या त्या वेदनांचा...


कधी चुकली तू असशील 

पण चुकलो मी इथे कित्येकदा

माफी तूही मागितली

पण माफीत तुझ्या मी सदानकदा...


हात तुझा हाती घेताना मी

स्पर्शात तुझ्या कित्येकदा हरवलो

सागर प्रेमाचा तू तरीही मी

सहवासात तुझ्या पार विरघळलो...


चिडलो रडलो तरीही मी

तुला नेहमीच आनंदात पाहिले

अशीच सदैव हसत रहा सखे

तुझ्या हसण्यासाठीच जीवन वाहिले...


नाही माहित मला काहीच

अस्तित्व त्या देवाचे आहे का नाही

पण प्रेमात तुझ्या वाहताना

सखे सापडले मला इथे बरेच काही...


साथ तुझी माझी अशीच राहू दे

आहेत जोवर चंद्र सूर्य तारे

येतील कितीतरी वादळे वाटेत

हसत हसत त्यास आपण जाऊ सामोरे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational