STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Others

3  

Dhananjay Deshmukh

Others

साथ...

साथ...

1 min
212

साथ काव्याला शब्दांची

उरल्या सुरल्या आठवांची

कधी सुख दुःखाची सोबती

कधी धार वाहती भावनांची...


कधी भरलेली ओंजळ

गोड आठवणीतल्या क्षणांची

कधी रिती सरिता भासे

विरहात रडलेल्या दुखऱ्या मनांची...


साथ कागदाला लेखणीची

लाल निळ्या त्या गर्द शाईची

कधी काटेरी टोचणार्‍या टोकाची

तर कधी अलगद फिरणार्‍या मोर पिसाची...


कधी रंगरंगीत शब्दांची

सहवासातल्या त्या गोड स्वप्नांची 

कधी नुसत्याच शुभ्रतेची 

अथांग पसरलेल्या त्या नीरव गगनाची... 


साथ शेवटी साथ आहे 

असो प्रेमाची वा भेटलेल्या आठवांची 

नाही सोडत कधीच एकटे जिवा 

चालते ती सोबत घेऊन रांग वचनांची... 


Rate this content
Log in