STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract Tragedy Inspirational

3  

Dhananjay Deshmukh

Abstract Tragedy Inspirational

शब्दांचे माझ्या शुभ्र मोती झाले

शब्दांचे माझ्या शुभ्र मोती झाले

1 min
162

 कित्येकदा तरी सावरली

डायरीतील निखळलेली पाने

होते ज्यावर लिहिलेले 

माझ्या जीवनाचे तरल तराने


जोडण्याचेही झाले माझ्याने 

तरीही कित्येकदा ते विस्कटले

धरून ठेवले हाती घट्ट

तरीही हातून बर्‍याचदा निसटले


कप्प्यात मनाच्या बंदिस्त

पण अस्ताव्यस्त सारेच विखुरलेले

जमवण्याचा प्रयत्न नेहमीचाच

पण पसरणे त्यांचे सारखेच ठरलेले


कित्येक आठवांचे उमाळे 

त्यात लेखणीने माझ्या लिहिलेले 

सुख दुःखाचे रंगतरंग 

लाल निळ्या शाईत त्यावर उमटलेले 


अजुनही एकवटत आहे मी 

माझ्या डायरीतील निखळलेली पाने 

पाहिले होते मी स्वप्नात जे 

तेच होते त्यावर माझ्या जीवनाचे तराने


पानावरील त्या डायरीच्या

शब्दांचे माझ्या शुभ्र मोती झाले

सावरता सावरता थोडेसे

अश्रू बनून नकळत ते ओघळले 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract