STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Inspirational

4  

Dhananjay Deshmukh

Inspirational

क्षणात घेतलेला निर्णय...

क्षणात घेतलेला निर्णय...

1 min
229

क्षणात घेतलेला निर्णय

आयुष्याला एक कलाटणी देतो

असो तो निर्णय चांगला वा वाईट

देतो उभार किंवा उद्ध्वस्त करतो...


असावे चित्त ठायी आपले

निर्णय आयुष्यातला कोणताही घेताना

व्हावे विचाराधीन त्या निर्णयाच्या

घेत असलेल्या निर्णयाचा विचार करताना...


प्रसंग कोणताही असो

तो कधीच येत नाही माघारी परतून

गेला तो हातातला क्षण निसटला

न हसावे न रडावे क्षणास त्या आठवून...


निर्णय आपण घेत असलेला

नसावा तो कुणाच्या भावना दुखावणारा

देऊन डोळ्यात अश्रू इतरांच्या

नसावा त्यात स्वार्थ क्षणिक सुख देणारा...


निर्णय जरी निर्णय असला

तरी तो घेताना प्रसंगाचे गांभीर्य असावे

होतील जरी आपली काही स्वप्ने उद्ध्वस्त

पण कुणाचे त्यात स्वप्न चिरडणारे नसावे...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational