STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Romance Others

4.2  

Dhananjay Deshmukh

Romance Others

तुझ माझ प्रेम रेखाटू कस..?

तुझ माझ प्रेम रेखाटू कस..?

1 min
243


सुख दुःखाचा सागर असतो 

प्रेम आपलेपणाचा पाझर असतो

आटला किती जरी खोलवर तो 

ओलावा मात्र त्याचा कायम असतो... 


भेटत कुणी क्षणासाठी 

होत कुणी आयुष्यभराचा सोबती 

न भेटलेला कायम असतो हृदयात 

मनाच्या पिंजर्‍यात काळजा भोवती... 


तुझ माझ प्रेम रेखाटू कस..? 

वाहणार्‍या माझ्या अथांग लेखणीतून

नाहीत शब्द मजकडे आता 

तेही थांबलेत माझ्या ओठी काळजातून... 


अट्टहास जरी किती केला 

तरी नाहीच मांडू शकत मी तुला 

नको सुकणे उगाच असे 

बहरू दे तुझ्या त्या सुंदर बागेला... 


आजवर लाभलेला सहवास 

कायम असाच मी मनात माझ्या ठेवीन 

नाही देणार इथल्या दोष कुणाला 

तोषीस माझ्या मी स्वतःलाच लावीन... 


Rate this content
Log in