STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Abstract Others

4  

Dhananjay Deshmukh

Abstract Others

जग सारे आहे स्वार्थाचे...

जग सारे आहे स्वार्थाचे...

1 min
386

असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ

असे नियतीचे लेणे घ्यावे ते जाणून

न जावे शरण कुणा उगाच कधी 

टाकावे पाउल त्याचे साधर्म्य ओळखून... 


असावी संगत सज्जनांची 

सावलीतही दुर्जनांच्या उभे न राहावे 

घ्यावे जाणून मर्म वागण्याचे 

उगाच कुणाच्या तोषीस न लागावे...


जग सारे आहे स्वार्थाचे

भेटतात लबाड लांडगे पावलोपावली 

न भुरळावे थापास त्यांच्या

करतात घात देऊन शालीनतेची सावली...


साधेपणाचे जरी असले वागणे

जगणे आपले कधी दुर्जनांपरि नसावे

द्यावा आधार इथल्या दीन दुबळ्यांना

ते नसतील आपले पण आपण त्यांचे व्हावे... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract