STORYMIRROR

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

3  

Dhananjay Deshmukh

Inspirational Others

जगण्यात मौज आहे...

जगण्यात मौज आहे...

1 min
232

जगण्यात मौज आहे

जगण्याचा अर्थ कळेल जेंव्हा

ठरेल निरर्थक जन्मही आपला

आनंदी मन आपले नसेल तेंव्हा...


आयुष्य एकदा नाहीच मुळी

दररोज नव्याने ते भेटीला येते 

मरणे मात्र येथे एकदाच येते

जे आयुष्यासवे सर्वच हिरावून नेते...


जगणे असते अवघड जरी

जगावे ते आनंदाने क्षणोक्षणी

कोण जाणे कोणता क्षण वाईट

धडकेल येऊन पायी रानोरानी...


जगण्यात मौज आहे

जगण्याचा मार्ग सापडेल जेंव्हा

दुःखाची साखळी असतेच पायी 

क्षणिक आनंदाने ती तुटेल तेंव्हा... 


देणे हिरावून घेणे असते 

देणार्‍या त्या नियतीच्या मनात 

तरीही आनंद शोधणे असते 

भेटलेल्या या माणसाच्या जन्मात... 


नाही जन्म पुन्हा येथे 

मरणही नाही येथे पुन्हा पुन्हा

करावी मौज जगण्याची सदा 

न करावा उगाच मरण्याचा गुन्हा... 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational