STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

4  

Nutan Pattil

Inspirational

मोगरा फुलला

मोगरा फुलला

1 min
359


अंगणात आज माझ्या

सुगंध हा दरवळला!!

काय हे गुपित घडले

आज मोगरा फुलला!!


कळ्या कळ्या या

मोगर्याच्या बहरल्या!!

पांढऱ्याशुभ्र वर्णात

आज डोकावू लागल्या!!


मोह नाही आवरला मज

तोडून सर्व घेतल्या!!

माळून गजरा सुंदर

कळ्या सर्व वेचल्या!!


मनी पण फुलला

हा शुभ्रधवल मोगरा!!

प्रफुल्लित झाले तन मन

जसा निळा सागरा!!


चांदण्यासम भास कळ्यांचा

असा हा मोगरा फुलला!

परिमल दरवळ आसमंतात

आसमंत ही भुलला!!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational