चांदोमामा
चांदोमामा
लहान मुलांचा लाडका मामा
चांदोमामा चांदोमामा राहतोस कुठे?!!
पांढरा शुभ्र दिसतोस निळ्या निळ्या आकाशात
तुला पाहून डोळ्याचे पारणे फिटे!!
चांदण्या तुझ्या मैत्रिणी असशी
मित्र सारे ग्रह, आणि सूर्य तारे!!
पौर्णिमेचा चंद्र मोठा, दिसतोस तू सुंदर
पाहून तुझे सौंदर्य मुग्ध होतात सारे!!
धरती वरून दिसतोस तू मोहक आणि सुंदर
येणार मी तुला भेटायला आकाश
गंगेमध्ये!!
चांदण्यांबरोबर खेळायला मला आवडते
जिवनामध्ये आनंद येईल चांदोमामा तुझ्या संगे!!
कलेकलेने वाढतोस रूप तुझे मनोहर
चांदोमामा चांदोमामा हसतोस किती छान!
तुला पाहून चांदोमामा
आनंदी होतात मोठे आणि लहान!
चांदोमामा चांदोमामा प्रकाश तुझा शितल
अंधाऱ्या रात्रीला सदैव नेहमी असतोस
इकडून तिकडून फिरताना राहतोस माझ्याबरोबर
असा तू चांदोमामा मला खूपआवडतोस
