STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

स्पर्श तुझा

स्पर्श तुझा

1 min
240

बेधुंद मन झाले

तुझ्या त्या स्पर्शाने!!

माझी मी न राहीले

त्या गहिर्‍या आर्कषणाने!!


हवा हवा वाटतो 

तो तुझा स्पर्श !!

मोरपिसारा फुलतो

अंतरंगी दाटतो हर्ष!!


कोमल माझी काया

रोमांचित झाली!!

स्पर्शाने सख्या माझ्या

गालावर लाली आली!!


स्वप्न मनी तुझे पाहिले

आज ते सत्यात आले!!

स्पर्शुनी मजला गेले

प्रियतमा मी तुझी झाले!!


स्पर्श तुझा नयनी वसे

हृदयी मी नित्य जपे!!

तुझी होण्यासाठी सख्या

केली मी अनेक तपे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational