STORYMIRROR

Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

आला ऋतू पावसाचा

आला ऋतू पावसाचा

1 min
151

आला ऋतू पावसाचा

झाले ओलेचिंब रान!!

अशा धुंद पावसात

मोहवून टाके पान!!


पावसासोबत वारा

खेळ खेळे निर्सगाशी!!

ऋतू ह्य हिरवागार

जादू करे माणसाशी!!


पक्षी फिरे ओलाचिंब

पावसात सरसर!!

मुले खेळी अंगणात

गारा वेची भरभर!!


नेसुनीया हिरवाई

धरतीला शोभा आली!!

पावसाच्या या थेंबानी

झरे ही वाहू लागली!!


दरवळे सुगंध हा

भिजलेल्या मातीचाच!!

स्पर्श हवा पावसाच्या

 मंदगार थेंबाचाच!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन