STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

दुर्गामाता

दुर्गामाता

1 min
185

तू दुर्गा तू चंडिका

तुच भवानी तूच माता!!

तू महिषासुरमर्दिनी

पूजते देवी मी आता!!


नऊ दिवसाचा उत्सव

घेऊन आली नवरात्र !!

अखंड ज्योत लावून 

पुजा करीन अहोरात्र!!


नऊ दिवसाचे नऊ रंग

घटस्थापना करूया!!

फुलांच्या माळा बांधुन

पूजा घटाची करूया!!


जय अंबे जय दुर्गा

नऊ दिवस तूझा उपवास !!

करू तुझी सेवा

सतत देवी तुझाच ध्यास!!


श्रीसुक्ता चे पाठ करून

देवी करू तुझा जागर!!

भक्तांना तू पावते

दुर्गामाता तू भक्तांचा सागर!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational