STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

3  

Nutan Pattil

Inspirational

लेक माझी लाडाची

लेक माझी लाडाची

1 min
14

लेक माझी लाडाची

सुंदर आणि सुशील!!

सर्वांमध्ये प्रिय मला

आई कधी म्हणशील?


नाजुक अशी परी

जशी की स्वप्नसुंदरी!!

बाहुलीसारखे बोलके डोळे

आईचे पण काम किती करी!!


मधा पेक्षा ही गोड वाटे

गोड गोड तिचे बोलणे!!

सुंदर तिची काया

आणि लुटू-लुटू चालणे!!


निरागस आणि प्रेमळ

हास्य तिचे लोभस!!

सर्वांची ती लाडकी 

दिसते कशी गोंडस!!


गोड सुंदर कन्या माझी

भाग्यवंत मी माता झाले!!

मिळाली साक्षात मला लक्ष्मी

आई बनायचे सौभाग्य मला मिळाले!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational