तूच तुझी
तूच तुझी
किती थांबवशील तू स्वतःला...
तसं पण इथं परवा नाही कुणाची कुणाला...
प्रत्येक जण पुढे पळत आहे...
जबाबदारीची कर्तव्य पूर्ण करत आहे...
मिळत आपल्याला आयुष्य एक...
म्हणूनच जगण्याचा प्रयत्न करावा नेक...
किती ते प्रश्न...
त्याची किती ती उत्तर शोधायची...
इतकं सगळं करून समाधानी मात्र कोणीच नाही...
तुझ्या समाधानासाठी तुलाच आता पहाव लागेल...
त्यासाठी मनाचं ऐकून...
तुझ्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायला लागेल...
राहिलेली स्वप्न नव्याने पहावी लागतील...
ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करावे लागतील...
तुझी स्वप्न सत्यात उतरवणे...
इतकी काबीलियत नक्कीच तुझ्यात आहे...
प्रत्येक गोष्ट तडीस नेण्याची खासियत...
कारण तुझ्यातच आहे...
थोडंसं जगावेगळं वाटणार...
पण तुला मनापासून करायचं असणारं...
करून बघायला काय हरकत आहे...
यासाठी तुझीच तुला परवानगी आहे...
किती थांबवशील तू स्वतःला...
इथे परवा नाही कुणाची कुणाला...
