सल
सल
कसं असतं आपलं जीवन...
कधी मन बनतं राम...
तर कधी रावण...
सगळ्या गोष्टी कशा बरोबरच करायच्या असतात...
बरोबर करायच्या नादात चुकाही मग घडतात...
कधी कधी यात चुका लक्षात राहतात...
मग हळूच मनात खोल उतरतात...
चुका सुधाराव्यात असं सारखं वाटतं...
पण तशी संधीच कधी मिळत नसते...
चूक बरोबर करून पण काय होणार...
मनातली असेल तर मनातच राहणार...
गेलेली वेळ परत कधीच येत नसते...
म्हणून तर म्हणतात...
मागचं विसरून पुढे जायचं असतं...
अनुभवलेली प्रत्येक गोष्ट खूनघाट बांधून लक्षात ठेवायची...
पुढे जाताना अशी चूक कधीच नाही घडू द्यायची. ..
