महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र देशा
दणकट देशा कणखर देशा
मराठमोळ्या महाराष्ट्र देशा!
कडेकपाऱ्या जंगल झाडी
सह्याद्रीच्या बळकट देशा!
तू शिवबाचा श्वास ध्यास अन्
रक्तप्रवास धमनीतला खासा
शूर मावळे नि गनिमी कावा
दूर पळविले बा तू क्लेशा!
शंभू छावा दहाड मोठी
भूषण आम्हा आम्ही मराठी
अन्यायाची चीड खरोखर
पोसत आलो आम्ही त्वेषा!
देश धर्म अन् मराठीबाणा
मराठा अवघा एक जाना
कुठे आम्हाला बंधन कैसे?
आम्हा मोकळ्या दाही दिशा!
दणकट देशा कणखर देशा
मराठमोळ्या महाराष्ट्र देशा!
