STORYMIRROR

Jairam Dhongade

Others

3  

Jairam Dhongade

Others

दुःखा

दुःखा

1 min
184

छेडून काळजाची गेलास तार दुःखा...

मी मानणार नाही इतक्यात हार दुःखा!


पाहून मी सुखाला बधलो कधीच नाही,

पाठीस दैन्य असता कसला विचार दुःखा?  


बेधुंद धावतो मी स्पर्धेत या सुखाच्या...

गाठावयास पल्ला झालोय स्वार दुःखा! 


केले सशक्त मजला तू केवढे लढाया...

आहे सलाम तुजला माझा त्रिवार दुःखा!


कंटाळला जरी तू जातो कुठे अताशा?

गात्रात जोर तोवर कर तू प्रहार दुःखा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन