STORYMIRROR

Jairam Dhongade

Others

3  

Jairam Dhongade

Others

चैतन्यमास

चैतन्यमास

1 min
93

मौसम किती सुहाना बरसात खास आहे,

खिचडी गरम भज्यांची, लागून आस आहे!


मग घोट घोट घ्यावी प्याल्यातुनी सुरा ती,

वाटेल दुःख सारे, अपलेच दास आहे!


आनंद पावसाचा घ्यावा असा तसाही,

भाजून गोड भुट्टे, खाया उल्हास आहे!


का जिंदगी जगावी आशाळभूत सारी?

मित्रासवे रमावे, चैतन्यमास आहे!


मज वाटले जसे ते मांडून मोकळा मी,

हो बोलवा मलाही, मी आसपास आहे!


(सुरा- मद्य, मदिरा, दारू / भुट्टे- मक्याचे कणीस)


Rate this content
Log in