STORYMIRROR

Jairam Dhongade

Drama

3  

Jairam Dhongade

Drama

रंगभूमी

रंगभूमी

1 min
196

आटापिटा खटाटोपी

वेळेमाजी बहुरुपी...

चोखाळाव्या किती वाटा?

जीवन केवढा रेटा!


याची घाला त्याला टोपी

ना कोणती वाट सोपी...

दुनिया ही रंगशाला,

जो मिळाला रोल केला!


भुलभुलैय्या खेळ हा

लागला का मेळ कोणा?

शेवटाला एक वाट...

खुणावे स्मशानघाट!


नाटकाचा अंक मृत्यू

ना चाले किंतू परंतू...

नाही कोणी छोटा मोठा,

भोग आणि भोगवटा!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama