विद्या
विद्या
मती निती गती । निघोनिया जाती ।।
अलौकिक ख्याती । विद्येची त्या ।।
विद्या असे ज्ञान । जगण्याचे भान ।।
मिळे जगी मान । ज्ञानवंता ।।
वाघिणीचे दूध । प्राशिले तो सिद्ध ।।
होईल प्रसिद्ध । विद्येमुळे ।।
साऊ आणि ज्योती । झिजले गा किती ।।
फुलवाया मोती । विद्यारूपी ।।