STORYMIRROR

Jairam Dhongade

Classics

3  

Jairam Dhongade

Classics

सांगून राम गेला

सांगून राम गेला

1 min
107

शब्दास जाग मित्रा सांगून राम गेला

मोहास टाळ मित्रा सांगून राम गेला!


संघर्ष हेच जीवन भात्यात बाण ठेवा

संधान साध मित्रा सांगून राम गेला!


येतात संकटे ती संकल्प ठोस ठेवा

संपेल भोग मित्रा सांगून राम गेला!


एकत्व एकनिष्ठा जगण्यात एक पाळा

एकीस सांध मित्रा सांगून राम गेला!


वनवास जीवनी या ठासून भोगल्यावर

करशील राज मित्रा सांगून राम गेला!



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics